मंत्रालयाला पुन्हा लागली आग

mantralaya
मुंबई – मंत्री आणि कर्मचाऱ्यांच्या पोटात मंत्रालयात पुन्हा एकदा आग लागल्याच्या बातमीने भीतीचा गोळा उठला असून शॉर्टसर्किटनंतर धूराचे लोळ उठल्याने सुरक्षेच्या कारणासाठी मंत्रालयाचा पहिला मजला खाली करण्यात आला आहे.

पहिल्या मजल्यावर मंत्री राजेद्र गावित यांच्या कार्यालयाजवळ शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे सात बंब तेथे पोहोचले आहेत आणि आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रालय आणि आग हे दृष्टचक्र गेल्या काही वर्षांपासून सूरूच असल्याने तेथील कर्मचारी नेहमीच दहशतीखाली काम करताना दिसत आहेत. जून २०१२ मध्ये लागलेल्या आगीत मंत्रालयातील ५ कर्मचाऱ्यांचा बळी गेला होता. तसेच या आगीत अनेक महत्वाच्या फाइल्स जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर मार्च २०१३ मध्येही मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागून मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याने मंत्रालयाच्या फायर सेफ्टीवरच संशय घेतला जात आहे.

Leave a Comment