बेनझीर भुट्टोंची लंडनमधली हवेली लिलावात

bemzir
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या मालकीचे असलेले व एका अज्ञात ग्राहकाने २००४ मध्ये त्यांच्याकडून विकत घेतलेले आलिशान घर लिलावात काढले जाणार असल्याचे वृत्त आहे. ४ जुलैला गल्डफोर्ड रेडिसन ब्ल्यू या घराचा लिलाव करणार आहे व त्याला किमान १ कोटी पौंड म्हणजे १ अब्ज २ कोटी रूपये किंमत अपेक्षित आहे.

१९९५ साली रॉकवूड स्टेट नावाचे हे घर बेनझीर भुट्टो आणि त्यांचे पती झरदारी यांनी संयुक्तरित्या विकत घेतले होते. आलिशान असा हा जणू स्वप्नातला महाल आपल्या मालकीचा असल्याचा मात्र या दोघांनीही नेहमीच इन्कार केला होता. कारण त्यावेळी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे खटले सुरू होते. हा महाल भ्रष्टाचाराच्या पैशातूनच विकत घेतला गेला होता असे कांही खात्रीलायक सूत्रांकडूनही सांगितले जाते. २००४ साली अज्ञात खरेदीदाराला या महालाची विक्री करताना झरदारी यांनी हा महाल त्यांच्या मालकीचा असल्याची कबुली दिली होती. त्यावेळी तो ४ लाख पौंडाना विकला होता. मात्र ज्याने ही हवेली विकत घेतली तो या घरात कधीच राहिला नाही. त्याचा उपयोग रेव्ह पार्टी आणि भाड्याने देण्यासाठीच केला गेला असेही समजते.

या हवेलीत दोन बॉम्बप्रूफ बेडरूम्स आहेत. ३० खोल्या असलेल्या या हवेलीत एकूण ११ बेडरूम, पाच बाथरूम्स, १ मोठा हॉल, ड्राईंग रूम, २ फार्म हाऊसेस, २ छोटी घरे, विमानाचा हँगर आणि पब असून याचा पसारा ३५० एकरात पसरलेला आहे. कराचीत ही हवेली सुरे मॅन्शन नावाने परिचित असून या हवेलीतील बेनझीर यांचे डायनिंग टेबलच १ लाख २० हजार पौंड किमतीचे असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment