पुरात वाहून गेल्याने 26 जणांचा मृत्यू

china
बीजिंग- गेल्या पाच दिवसांपासून दक्षिण चीनमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये 26 जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हुनान प्रांतामध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पूर आले असून, दरडी कोसळल्या आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. आठ हजार 700 घरे पूर्णपणे पडली असून, 66 हजार घरांचे नुकसान झाले आहेत.

पुरामध्ये वाहून गेल्याने 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी नागरिक पाण्यामध्ये अडकले असून, त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment