गेलची स्फोटक खेळीने तोडले अनेक रेकॉर्ड्स

chris-gayle
पोर्ट ऑफ स्पेन – स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने घरच्या मैदानावर खेळताना अशी तूफान खेळी केली की, कसोटी क्रिकेटमधले अनेक विक्रम मोडीत काढले. क्विन्स पार्क ओव्हलमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाहुण्या न्यूझीलंडला दहा विकेट्सनी पराभूत केले.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला विजयासाठी 93 धावांचे आव्हान होते. अशातच सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतअवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गेलने 46 चेंडूत 80 धावा केल्या, यामध्ये सात चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.

या झंझावाती खेळीत गेलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. गेलने 28 चेंडूत 50 धावा करुन कसोटी क्रिकेटमधील सहावी सर्वात जलद खेळी केली.

ख्रिस गेलने या खेळीत सहा षटकार ठोकले. या षटकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 96 षटकारांची नोंद झाली आहे. या विक्रमामध्ये गेल दुसऱ्या स्थानावर आहे. विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला 4 षटकारांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट 100 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

या षटकारांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेलने घरच्याच मैदानात 150 षटकार लगावण्याचा शानदार विक्रम केला आहे. या यादीत 169 षटकारांसह न्यूजीलंडचा ब्रॅण्डन मॅक्युलम टॉपवर आहे.

कसोटी सामन्याच्या या खेळीत गेलने 173.91 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या जो त्याचा वैयक्तिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट आहे. त्याचबरोबर त्याचा हा स्ट्राईक रेट तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Comment