१ जुलैपासून शिक्षकांचा बेमुदत संप

teacher
मुंबई – राज्यातील शाळा २६ जूनला सुरु होत असल्यामुळे पाल्य आणि पालकांची शालेय सामग्री घेण्यासाठी लगबग सुरू झाली असतानाच सर्व शिक्षकांनी १ जुलैपासून बेमुदत संप जाहीर केला आहे. त्यामुळे शाळेचा पहिला ठोका वाजणार की नाही यात शंकाच आहे.

राज्यातील ३० ते ४५ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. या शिक्षकांना ‘अतिरिक्त ’ शिक्षक म्हणून नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. त्यामुळे सर्व शिक्षक परिषदेने १ जुलैपासून बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. हे सर्व शिक्षक २७ जून रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

माध्यमिक स्तरावर पटसंख्येचा निकष आणि नव्या स्टफिंग पद्धतीमुळे मुंबईतील दीड हजार शिक्षकांसह राज्यातील सुमारे ४५ हजार शिक्षक ‘अतिरिक्त ’ ठरणार आहेत. पटसंख्येचा निकष ७१ विद्यार्थ्यांवर आला असल्यामुळे वर्गातील एक विद्यार्थी कमी झाला तरी एक तुकडी आणि दोन शिक्षक बाहेर जातील. या शिक्षकांना समाविष्ट करण्यासाठी इतरत्र जागा नसल्यामुळे या शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आहे.

शालेय शिक्षण सचिव अश्‍विनी भिडे यांनी सांगितले की, कोणत्याही शिक्षकाला राज्य सरकार वार्‍यावर सोडणार नाही. रिक्त झालेल्या पदावर आम्ही त्यांना सामावून घेणार आहोत. असे असतानाही, आज शिक्षक परिषदेनं सरकारविरोधात आक्रमक पाऊ ल उचलले असून १ जुलैपासून बेमुदत शाळा बंद करण्याचे ठरविले आहे

Leave a Comment