लिएंडर पेसविरोधी घरगुती हिंसेची तक्रार

leander
मुंबई – लिएंडर पेस याच्याविरोधात त्याची पूर्वीची प्रेयसी आणि लिव्ह इन पार्टनर मॉडेल रिया पिल्लईने घरगुती हिंसा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. महानगर दंडाधिकारी यांच्याकडे रियाने ही तक्रार दाखल केली आहे. तसेच पेसच्या वडिलांविरोधातही तक्रार केली आहे.

रिया पिल्लईने पेसला प्रत्येक महिन्यात ४ लाख भत्याची मागणी केली आहे. तसेच पेस आणि त्याच्या वडिलांनी आपल्याला व आपल्या मुलीला कार्टर रोडच्या घरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे, असा आरोपही रियाने केला आहे. या प्रकरणी ३० जूनला सुनावणी होणार आहे.

लिएंडर पेस आणि रिया या दोघांमध्ये आपल्या आठ वर्षाच्या मुलीचा ताबा मिळावा म्हणून वाद सुरू होता. मागील महिन्यात पेसने मुलीचा कायम स्वरूपात ताबा मिळावा म्हणून फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती.

Leave a Comment