मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची गाढवावरुन धिंड

beed
बीड – बीडमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. शिवसंग्राम संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रांची गाढवावरुन धिंड काढत आपला निषेध व्यक्त केला.

शिवसंग्राम संघटनेने हि निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली. मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकारने २१ जून रोजी देण्याचे जाहीर केले होते. राणे समितीचा अहवाल येऊन देखील राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

निराधार दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बीडमधील महिलांनीही आज शोले स्टाईलने आंदोलन केले. बीडच्या तहसील कार्यालयाच्या गच्चीवर १०० ते १५० महिलांनी हे आंदोलन केले.

Leave a Comment