ब्राझील-कॅमेरून लढतीकडे लक्ष

barazil

ब्रासिलिया : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाव वेळा विजय मिळवलेल्या ब्राझील संघाची गाठ आता कॅमेरून संघाशी होत आहे.‘अ’गटातील या लढतीत ब्राझीलची बाजू वरचढ दिसत आहे़. दुसरीकडे स्पर्धेतून आव्हान संपलेला ब कॅमेरून संघ आपल्या अखेरच्या लढतीत सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फुटबॉल स्पर्धेतील ‘अ’ गटात ब्राझील संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. त्यांना अंतिम १६ संघांत आपले स्थान निश्चित करण्यासाठी केवळ सामना बरोबरीत ठेवावा लागणार आहे. कॅमेरून संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हा संघ स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे़ त्यामुळे हा संघ ब्राझीलविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असेल़ संघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास यजमान ब्राझील संघाची बाजू वरचढ दिसते़ या दोन्ही संघांत झालेल्या चारपैकी तीनमध्ये ब्राझीलने विजय मिळविला आहे.

कॅमेरून संघाने २००३ च्या कन्फेडरेशन चषकात एकदा ब्राझीलवर मात केली होती़.आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषकामध्ये खेळणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे. हा विश्वचषक ब्राझीलमध्ये होत असल्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे़ संघांत नेमारसह जुलिओ सेजार, डॅनिएल एल्वेस, थियागो आणि डेव्हिड लुईससारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.या खेळाडूंच्या बळावर संघ कॅमेरूनविरुद्ध सहज विजय मिळवू शकतो़.