जळगावात शिक्षकाची मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या

sucied
जळगाव – एका शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून होणार छळ व तहसील कार्यालयातून मिळालेल्या धमकीमुळे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगावत घडली आहे. महेंद्रसिंह सिसोदिया असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

सिसोदिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येमागचे कारण नमूद केले आहे. सिसोदिया हे भुसावळ तालुक्यातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ३५ मध्ये कार्यरत होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा पवार यांच्याकडून सिसोदिया यांना नेहमीच त्रास होत असल्याचा आरोप मृत शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा नोंदवला जावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी मृत शिक्षकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

४४ वर्षांचे सिसोदिया हे भुसावळ येथील हुडको कॉलनीत राहत होते. त्यांच्याकडे तिसरीचा वर्ग होता. शाळेच्या अध्यापना व्यतिरिक्त बीएलओ म्हणजेच मतदार नोंदणी अधिकारी हे पद देखिल शाळेने त्यांना दिले होते. त्यासाठी त्यांना दोन्ही पदांचे काम करावे लागत होते. यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. केंद्रावर गैर हजर राहिल्याने कारवाई केली जाणार अशी धमकी त्यांना तहसील कार्यालयातू आली होती.

यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी शाळेतील एका खोलीत छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्युपूर्व चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तहसील कार्यालयाला जबाबदार धरले आहे.

Leave a Comment