ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार टीम इंडिया

dhoni
मुंबई – विश्वविजेती टीम इंडिया २०१५मध्ये होणाऱ्या विश्व चषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेमध्ये खेळणार असून या ट्राय सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार कसोटी मालिकामधला पहिला सामना हा चार डिसेंबरला ब्रिसेबनमध्ये खेळला जाणार आहे. सीरिजचे बाकीच्या मॅचेस या अॅडिलॅड (१२ ते १६ डिसेंबर), मेलबर्न (२६ से ३० डिसेंबर) आणि सिडनी (३ ते ७ जानेवारी)ला होणार आहेत.

काही दिवसानंतर १६ जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होईल ज्यांचा शेवटचा सामना पर्थमध्ये १ फेब्रुवारीला होईल. तर वर्ल्डकप १४ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत चालू असतील.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंडने सांगितले की, पुढचे १२ महिने सगळ्यांसाठी काहीना काही नवीन आहे. मागील सत्रांपेक्षा काही नवीन गोष्टी असतील ज्याच्यामुळे खेळांडूना आणि प्रेक्षकांना दोघांना फायदा होईल.

आयसीसी क्रिकेट विश्वकप 2015 चा मुख्य भाग म्हणजे 2014-15 चे कार्यक्रम पहिल्या सत्राच्या तुलनेत खूप वेगळे असणार आहेत. आम्ही 23 वर्षांत पहिल्यांदा या विश्वकप चषकासाठी न्यूझीलँडसोबत सहकारी म्हणून खेळत आहोत, असेही सदरलँडनी सांगितले.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

> 4 ते 8 डिसेंबर (पहिली टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) ब्रिसबेन
> 12 ते 16 डिसेंबर (दूसरी टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया), अॅडिलॅड
> 26 ते 30 डिसेंबर (तिसरी टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) मेलबर्न
> 3 ते 7 जानेवारी (चौथा टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
> 16 जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
> 18 जानेवारी- ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड
> 20 जानेवारी- इंग्लंड वि भारत
> 23 जानेवारी- ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड
> 26 जानेवारी-ऑस्ट्रेलिया वि भारत
> 30 जानेवारी- इंग्लंड वि भारत
> पर्थ 1 फेब्रुवारी- अंतिम सामना

Leave a Comment