अल्जेरियाला मिळाला ३२ वर्षानंतर विश्वचषकात विजय

aljeria

पोर्टो अल्जेरे – फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अल्जेरिया अन दक्षिण कोरिया या दोन संघातील लढत रंगतदार ठरली. आतापर्यंतच्या विश्व्चषक फुटबॉल स्पलर्धेच्या ३२ वर्षाच्या इतिहासात अल्जेरियाला विजय मिळविता आला नव्हता. मात्र, या निर्णायकी सामन्यात अल्जेरियाने दक्षिण कोरियावर ४-२ असा दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यादत अल्जेरियाने फुटबॉलपटूंनी पहिल्या मिनिटापासून आक्रमक आणि वेगवान खेळ करत, दक्षिण कोरियावर एकापाठोपाठ एक चार गोल डागले. या कामगिरीमुळे अल्जेरिया विश्वचषकात चार गोल करणारा पहिला अफ्रिकन संघ ठरला आहे. सामन्याच्या २६ व्या मिनिटाला इस्लाम स्लीमानीने पहिला गोल केला. या धक्क्यातून दक्षिण कोरिया सावरतो ना सावरतोच तो लगेचच दोन मिनिटांनी रफीक हालीचीने दुसरा गोल डागला.

३८ व्या मिनिटाला दीजाबाऊने तिसरा गोल करत अल्जेरियाला सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवून दिले. अल्जेरियाच्या वेगवान खेळासमोर पूर्णपणे कोलमडून न पडता दक्षिण कोरियानेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ५० व्या मिनिटाला एच.एम.सॉनने दक्षिण कोरियासाठी पहिला गोल केला. मात्र अल्जेरियाकडून ब्राहिमीने ६२ व्या मिनिटाला चौथा गोल करत आघाडी वाढवली.दक्षिण कोरियाकडून जे.सी.कू ने ७२ व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी कमी केली. त्यानंतर मात्र दक्षिण कोरियाला कुठलीही संधी न देता अल्जेरियाने हा सामना जिंकला. ग्रुप एच मध्ये बेल्जियम खालोखाल अल्जेरिया तीन गुणांसह दुस-या स्थानावर आहे.

Leave a Comment