jarmai
फोर्टलेझा – विश्व्चषक फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप ‘जी’मधील जर्मनी आणि घाना या संघा दरम्यानचा सामना शेवटपर्यंत रंगतदार ठरला.या दोन्ही संघाने २-२ अशी बरोबरी केल्याने हा सामना अर्निणयीत राहिला आहे. या दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत प्रत्येकी दोन दोन गोल केले. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वीचा सामना जर्मनीने जिंकला आहे.

या सामन्यात जर्मनीचे चेंडूवर सर्वात जास्त वेळ नियंत्रण होते. सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले होते. मात्र दुसरे सत्र सुरु होताच जर्मनीकडून गोटझे याने ५१ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल झळकावला. या गोलला घानानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. घानाच्या ए.येव्यू याने ५४ व्या मिनिटाला दुसरा गोल करत घानाला बरोबरी साधून दिली.

त्यानंतर ६३ व्या मिनिटाला घानाच्या ए. ग्यानने दुसरा गोल गोलपोस्टमध्ये धाडत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र जर्मनीने पुढच्या काही मिनिटातच घानाशी बरोबरी साधली. ७१ व्या मिनिटाला जर्मनीच्य़ा क्लोझने दुसरा गोल केला. सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. याआधीच्या पोर्तुगाल विरुद्धच्या लढतीत जर्मनीने म्युलरच्या हॅटट्रिकच्या जोरावर वर्चस्व गाजवले होते.

Leave a Comment