फ्रान्सचा बाद फेरीत प्रवेश

france123

साल्वाडोर- पिफफा फुटबॉल वर्ल्डकपच्या’ई’ ग्रुपच्या फ्रान्स विरूद़ध स्वित्झर्लंड या मानांकित संघांमध्ये झालेल्या सामन्यावत फ्रान्सुने दमदार खेळीच्या जोरावार बाजी मारली आहे. फ्रान्सने दुस-या लढतीत गोलचा धडाका लावत स्वित्झर्लंडवर ५-२ असा धडाकेबाज विजय मिळवून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. या विजयामुळे आता फ्रान्यनचे बाद फेरीतील स्थाेन निश्चीात झाले आहे स्वित्झर्लंडला मात्र बाद फेरीत स्थामन मिळविण्याचसाठी झुंजावे लागणार आहे.

‘ई’ गटात बाद फेरी गाठण्यासाठी खरी चुरस जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्स आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या स्वित्झर्लंड या संघांमध्ये होती. त्यामुळे फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष होते. स्वित्झर्लंडच्या बचाव फळीच्या सुमार कामगिरीमुळे फ्रान्सने पूर्वार्धातच ३-० अशी आघाडी घेतली होती. स्वित्झर्लंडचा गोलकीपर दिएगो बेनाग्लिओच्या उत्तम बचावामुळे फ्रान्सला आणखी मोठा विजय मिळवण्यात अपयश आले. फ्रान्सकडून ब्लैस मातुडी, ऑलिव्हर जिरू, करिम बेन्झिमा, मॅथ्यू व्हॅबूएना, मोसा सिसोका यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर स्वित्झर्लंडकडून ब्लेरिम झेमाली, ग्रॅनिट झाका यांनी गोल केले.

फ्रान्सने अतिशय वेगवान खेळ केला. त्यामुळे त्यांच्या खेळासमोर स्वित्झर्लंडची बचाव फळी अगदीच दुबळी वाटत होती. सामन्याच्या सुरुवातीलाच चेंडू क्लिअर करण्याच्या प्रयत्नात स्वित्झर्लंडचा स्टिव्हन बर्गेन जखमी झाला. हेडरचा प्रयत्न करताना बर्गेनला फ्रान्सच्या जिरूची लाथ चेहऱ्यावर बसली. यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरील भागातून रक्त येऊ लागले. त्यामुळे बर्गेनला मैदान सोडावे लागले. लढतीच्या ३१व्या मिनिटाला स्वित्झर्लंडचा बचावपटू जॉहनने बेन्झेमाला पाडल्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. बेन्झेमाची स्पॉट-किक स्वित्झर्लंडच्या गोलकीपरने अडवली. त्यानंतर कॅबायेने पुन्हा त्यावर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बारला धडकला. यानंतर फ्रान्सने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले.

Leave a Comment