धूमकेतूवर पाण्याची नैसर्गिक निर्मिती !

dhumketu
वॉशिंग्टन – चालू वर्षअखेर मंगळ ग्रहाजवळून मार्गक्रमण करणार्‍या ‘सायडिंग स्प्रिंग’ नामक एका धूमकेतूवर पाण्याची नैसर्गिक निर्मिती होत असून, तेथे प्रतिसेकंद ५0 लिटर एवढय़ा वेगाने पाण्याचे उत्पादन होत आहे, असा दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) केला आहे.

‘अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे कि , आमच्या निरीक्षणानुसार आम्ही निरीक्षण केले त्या वेळी ‘सायडिंग स्प्रिंग’ धूमकेतूवर (सी/२0१३ ए १) १३ गॅलन अर्थात प्रतिसेकंद ४९ लिटर पाण्याची निर्मिती झाली,अशी माहिती अमेरिकास्थित मेरीलँड कॉलेज पार्क विद्यापीठाचे (यूएमसीपी) वरिष्ठ संशोधक टोनी फर्नहम यांनी दिली. पाणी निर्मितीच्या या वेगाने हा धूमकेतू अवघ्या १४ तासांत ऑलिम्पिक साईजचा एक स्विमिंग पूल भरून टाकेल, असेही ते म्हणाले. ‘सी/२0१३ ए १’ धूमकेतूचा लाल ग्रहाच्या कक्षेत परिभ्रमण करणार्‍या अंतराळ यानांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे खगोलशास्त्रज्ञांनी या वेळी स्पष्ट केले आहे. या धूमकेतूवर काही दुर्मिळ प्राचीन सामग्री असून, यानिमित्ताने या सामग्रीचा अभ्यास करण्याची नामी संधी संशोधकांना उपलब्ध झाली आहे. ‘नासा’च्या ‘स्विफ्ट’ उपग्रहाने मे महिन्याच्या अखेरीस या धूमकेतूची छायाचित्रे टिपली. त्यांच्या ‘ऑप्टिकल व अल्ट्राव्हायोलेट’ विश्लेषणाअंती सायडिंग स्प्रिंगवर पाण्याची कशी वेगाने निर्मिती होत आहे, हे निदर्शनास आले. ‘सायडिंग स्प्रिंग ‘मंगळ’ ग्रहाच्या दिशेने जाताना पहिल्यांदाच आपल्या सूर्याच्या उष्णतेचा अनुभव घेईल. यामुळे तो गरम होऊन त्याच्यातून विविध वायू व धूलिकण उत्सर्जित होतील, असे ‘यूएमसीपी’चे खगोलशास्त्रज्ञ डेनिस बोडविट्स यांनी सांगितले आहे.

Leave a Comment