‘ कॅम्पाकोला’वर कारवाईसाठी पालिकेचे पथक पोहचले

campacola
मुंबई – कॅम्पाकोला वसाहतीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आज(रविवार) पुन्हा एकदा या परिसरात दाखल झाले आहेत.

कॅम्पाकोला इमारतीमधील अनधिकृत सदनिकांचा वीज, पाणी आणि गॅसचा पुरवठा खंडित करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकसुद्धा घटनास्थळावर दाखल झाले असल्याने, कॅम्पाकोलावर आज कारवाई होण्याची अटळ शक्यता दिसत आहे. पालिकेने कॅम्पाकोलातील रहिवाशांना निर्णय घेण्यासाठी अर्ध्या तासाची मुदत दिली असून, त्यानंतर पालिकेच्या कारवाईला विरोध करणाऱ्या रहिवाश्यांविरोधात बळाचा वापर करण्यात येईल, असा इशारा पालिकेतर्फे देण्यात आला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी आणि शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला कॅम्पाकोला इमारतीमध्ये शिरण्यापासून रहिवाश्यांनी मज्जाव केला होता. त्यानंतर महानगरपालिकेने कारवाईत अडथळा आणणाऱ्या रहिवाशांविरुद्ध कलम १४३ (बेकायदा जमाव) कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा)नुसार वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Leave a Comment