काळा पैसा ; मोदी सरकारला सहकार्य होणार

black-money
झुरिच – स्वित्झर्लंडमधील बँक खात्यांमध्ये काळा पैसा बाळगणा-या संशयित भारतीय नागरिकांची यादी स्वित्झर्लंड सरकारने तयार केली असून त्यांची सर्व माहिती भारतीय सरकारला देण्यात आली आहे, शिवाय भारतातील नवनिर्वाचित सरकारला काळ्या पैशाच्या पाठपुरवठ्यासंदर्भात पुर्णपणे सहकार्य करण्याची तयारी स्विस सरकारने दाखविली आहे.

दरम्यान स्वित्झर्लंड बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार, जगभरातील देशांच्या स्विस बँकेत असलेल्या ठेवींच्या यादीत भारत ५८ व्या स्थानावर पोहोचला आहे.

स्वित्झर्लंडमधील बँकामध्ये काही भारतीय व्यक्ती आणि संस्थांच्या बँक खात्यांची आर्थिक पाहाणी करण्यात आली. त्यात या बँकांची खाती ट्रस्ट आणि अन्य कायदेशीर कंपन्यांच्या नावे असून यामध्ये कर चुकवेगिरी केलेला पैसा जमा केल्याचा संशय स्विस सरकारला असल्याची माहिती स्विस प्रशासनातील एका अधिका-याने दिली.

काळा पैसा असण्याची शक्यता असणा-या या बँक खात्यांमधील निधीचा तपशील पुरवण्यात द्विपक्षीय देशांतील गोपनीयता कराराचा अडथळा येत असल्याची माहितीसुद्धा या अधिका-याने दिली. भारतातील नवनिर्वाचित सरकारला स्विस बँकांमधील काळ्या पैशाच्या पाठपुरवठ्यासंदर्भात पुर्णपणे सहकार्य करण्याची तयारी स्विस सरकारने दाखविली आहे. भारत सरकारकडून यापूर्वी काळ्या पैशांच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती.

स्विस बँकेतील एकूण ठेवीच्या प्रमाणात युकेचा सर्वाधिक वीस टक्के वाटा आहे तर त्याखालोखाल यूएस, वेस्ट इंडिज, जर्मनी आणि युर्नेसी या देशांचा नंबर लागतो. या यादीत भारताने पाकिस्तानला पिछाडीवर टाकले आहे. पाकिस्तानचे स्थान ६९ व्या स्थानावरुन घसरले असून तो ७४ व्या क्रमांकावर आला आहे.

Leave a Comment