लोकलच्या दराबाबत राजनाथसिंह यांनाच महाराष्ट्र भाजपचे ‘साकडे’

rajnath
मुंबई – आधीच रेल्वे भाडेवाढीमुळे सर्वत्र मोदी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाच भाजपच्या नेत्यांनी लोकलचे दर कमी करावेत असे साकडे घातले आहे, त्यावर राजनाथसिंह यांनीही पंतप्रधानांपर्यंत मागणी पोहचविण्याची ग्वाहीही दिली आहे.

मुंबई लोकलचे दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र भाजप नेत्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आणि राजनाथ सिंह यांच्याबरोबर त्यासाठी बैठकही घेतली, त्यात मुंबईकरांसमोर आधी रेल्वेच्या विकासाचा प्लान ठेवावा, अशी मागणीही महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी केली मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपला या दरवाढीचा तोटा होऊ शकतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपने ही मागणी केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच शिवसेनेने कालच दरवाढीला विरोध केला होता. त्यामुळे रेल्वे दरवाढीच्या मुद्यावर महाराष्ट्र भाजप एकाकी पडली आहे. त्यावर मलमपट्टी करण्यासाठी भाजपने ही शक्कल लढवली असल्याचे ही बोलले जात आहे.

Leave a Comment