मुंडे कुंटुबियांविरोधात उमेदवार नाही; पवार

sharadpawar
मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघात होणा-या पोट निवडणुकीत भाजपने मुंडेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सर्व पक्षीय नेत्यांकडून गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पवारांनी मुंडेंनी राज्याच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानाची आठवण काढली.ते म्हणाले ज्यांना वेळेवर जाण्याची सवय नव्हती, पण मृत्युला जाताना ते वेळेच्या आधी का गेले अशा शब्दात मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

मुंडे यांच्यानंतर त्यांची कन्या पंकजा नक्कीच मुंडे यांच्याप्रमाणे गरीब आणि शेतक-यांसाठी काम करेल असा विश्वास केंद्रय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वपक्षीय शोकसभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, खासदार किरीट सोमय्या, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे, मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आशिष शेलार, विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महापौर सुनील प्रभु आदी नेते उपस्थित होते.

Leave a Comment