जबाब नोंदविण्यासाठी प्रीती अमेरिकेतून भारतात परतली

prity-zinta
मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण प्रिती झिंटा अमेरिकेहून मुंबईत रविवारी दाखल झाली असून माजी प्रियकर नेस वाडिया विरोधात केलेल्या तक्रारीबाबत सोमवारी जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नेस वाडियाविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केल्यानंतर प्रिती ताबडतोब अमेरिकेला रवाना झाली होती. ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरु असताना, नेस वाडियाने आपल्याशी छेडछाड केल्याचा आरोप प्रितीने पोलिसात केलेल्या तक्रारीत केला आहे.

महत्वाचे म्हणजे ही घटना घडल्यानंतर बारा दिवसांनी प्रितीने तक्रार केली होती. १३ जून रोजी प्रितीने मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जाऊन नेस विरोधात तक्रार केली होती.त्यानंतर ती अमेरिकेला निघून गेली. त्यानंतर बुधवारी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी प्रितीला जबाब नोंदविण्यासाठी मायदेशी परत येण्यास सांगितले.त्यानुसार ती भारतात परतली आहे. यापूर्वी केलेल्या तक्रारीत प्रीतीने म्हटले आहे की ,गरवारे पॅव्हेलियनमध्ये मी बसलेली असताना, रात्री नऊच्या सुमारास नेस तेथे आला व त्याने आपल्याला शिवीगाळ सुरु केली. मी त्याला हा प्रकार थांबवायला सांगितला;पण त्याने ऐकले नाही. अखेर मी तेथून जाण्यासाठी उठले ,तेव्हा त्याने माझा हात पकडून मला खाली खेचले . स्टेडियममध्ये सर्वांसमोर ही घटना घडल्याचे प्रितीने म्हटले आहे.

Leave a Comment