नवी दिल्ली – महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या सत्ता परिवर्तनासाठी सुंदोपसुदीच्या दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी ?
काँग्रेसने मोठ्या हिंमतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मुद्दा ठेवला आहे.
यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर एक ऑफर ठेवली आहे, ती म्हणजे काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी विलीन करा आणि आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करा.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना भेटून सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी ही ऑफर दिली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीला ही ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजकीय मोहिम उभी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र शरद पवारांनी काँग्रेसच्या या ऑफरवर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.