लो होरिझोन्टो : अर्जेंटीना आणि इराणविरुद्धचल लढत शेवटच्या मिनिटापर्यंत चित्तथरारक अशी ठरली. शेवटच्यार मिनीटात लिओनेल मेस्सी यांनी डाव्या पायाने नोंदविलेल्या अफलातून गोलच्या जोरावर अर्जेंटीनाने बाद फेरीत प्रवेश केला. या गटातील पराभवामुळे फुटबॉल स्प र्धेतील इराणचे आव्हारन संपुष्टानत आले आहे.
शनिवारी विश्वकप फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धची लढत जवळजवळ अनिर्णीत संपणार असल्याचे चित्र होते, पण मेस्सीने डाव्या पायाने मारलेला फटका या लढतीत अफलातून गोलरक्षण करणा:या इराणचा गोलकिपर अलिरजा हकिकीला गुंगारा देत केव्हा गोलजाळ्यात विसावला हे, दस्तरखुद अलिरजालाही कळले नाही. दोन लढतीत सहा गुणांची कमाई करणा-या अर्जेंटीनाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या लढतीत अर्जेंटीनाची भिस्त मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून होती आणि त्यानेही लौकिकाला साजेशी कामगिरी करीत संघाचा विश्वास सार्थ ठरविला.
इराणने या लढतीत बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता. त्यांनी बचावासाठी सात खेळाडूंची फौज तैनात केल्यामुळे अर्जेंटीना संघ गोल नोंदविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. मध्यंतरापूर्वी चेंडूवर अधिकवेळ इराणचे वर्चस्व होते. इराणला गोल नोंदविण्याची संधीही प्राप्त झाली होती, पण मिडफिल्डर अशकान देजागा याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. त्यानंतर मात्र अर्जेंटीनाने वर्चस्व गाजविले. इराणचा गोलकिपर हकिकची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मध्यंतरार्पयत गोलफलक कोराच होता.