गरिबांच्या देशात वाढली करोडपतींची संख्या

currancy
मुंबई : जगात भारताला गरीबांचा देश म्हणून ओळखले जाते, मात्र आता या गरीबांच्या देशात करोडपतींची संख्या लक्षणीय वाढ होत आहे.

वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2014च्या सर्वेक्षणानुसार मागच्या वर्षी 3000 नागरिक करोडपती झाल्यामुळे देशात एकूण करोडपतींची संख्या 1.56 लाखांवर गेली आहे. पण तरी सुद्धा भारताचा जगातील टॉप 10 देशांमध्ये समावेश नाही. या अहवालानुसार जगभरातील धनाढ्य लोकांच्या देशांमध्ये भारत सोळाव्या स्थानावर आहे. 2012 मध्ये भारतात करोडपतींची संख्या 1,53,000 होती. 2013 मध्ये ती वाढून 1,56,000 झाली.

करोडपतींची सर्वाधिक संख्या महाशक्ती असलेल्या अमेरिकेत आहे. 40,60,000 करोडपती अमेरिकेत आहे. तर 23,27,000 जपानमध्ये, जर्मनीमध्ये 11,30,00, चीनमध्ये 7,58,600 आहे. याशिवाय मागील वर्षी जगभरातील करोडपतींची संख्या 17.6 कोटी झाली आहे.

Leave a Comment