शॉन टेट झाला भारताचा जावई

tait
मुंबई – ऑस्ट्रेलियचा स्टार क्रिकेटर शॉन टेट याने भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत १२ जूनला लग्न केले आहे. चार वर्षांपासून हे दोघे डेट जात होते.

शॉनने आपला विवाह समारंभ मुंबईतच पार पडला, असून त्यावेळी शॉनचे काही मित्रही आणि भारतीय क्रिकेट टीमचे झहीर खान आणि युवराज सिंग या दोघानीही लग्नाला हजेरी लावल्याचे समजते आहे.

एका इंग्रजी वर्तमानुसार, एका वर्षापूर्वी पॅरीसला असताना शॉनने माशूमला लग्नासाठी मागणी घातली होती. २०१० च्या आयपीएल दरम्यान या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर शॉनने लग्नाची मागणी घातल्यानंतर मागील वर्षी ऑगस्टमध्ये यांचा साखरपुडा झाला होता.

या वर्षीच्या आयपीलमध्ये शॉनला कोणीही विकत घेतलेले नव्हते, त्याआधी शॉन राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. शॉनने २०११ मध्येच ३५ वनडे खेळत या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Leave a Comment