मुंबईत एल्फिटन्स येथील नमन टॉवरला भीषण आग

fire
मुंबई – मध्य रेल्वेच्या परळ आणि पश्चिम रेल्वेच्या एलफिस्टन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नमन टॉवर्स या इमारतीला भीषण आग लागली असून, शॉर्टसर्किटमुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धी इमारत रिकामी केली आहे. रेल्वेचा विद्युत पुरवठा केंद्र या इमारतीच्या जवळ असल्याने आग आटोक्यात येणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग शॉटसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर ती वाढत वरच्या मजल्यावर गेली. इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. इमारतीत अडकलेल्या कर्मचा-यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Leave a Comment