नवी दिल्ली – भारतात घराघरातून अनेक वर्षांपूर्वी सोन्याचा धूर निघायचा, असे आपण काहींच्या तोंडून ऐकले असेलच, पण भारताकडे किती सोने आहे आणि ते कुठे आहे ? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एका आरटीआयच्या उत्तरातून भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या ही ताणली गेलेली उत्सुकता काही प्रमाणात कमी होते. एका आरटीआय कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एसबीआय बँकेने भारताकडे परदेशात जमा असलेले सोने जवळपास 265 टन पेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. या उत्तरात हे सोने कुठे ठेवण्यात आले आहे? ते फक्त भारतात आहे की, देशाबाहेरही ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच ते सोने कुठल्या स्वरुपात ठेवले गेले आहे? याचेही उत्तर देण्यात आले आहे.