मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाकिस्तान व बांग्लादेशातील नागरिक वगळता अन्य सर्व निवासी आणि प्रवासी नागरिकांना देशाबाहेर जाताना २५ हजार रूपयांचे भारतीय चलन नेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी देशाबाहेर जाताना भारतीय प्रवासी केवळ १० हजार रूपये नेऊ शकत असत. नव्या आदेशानुसार आता ही रक्कम २५ हजार करण्यात आली आहे.
परदेशी जाताना २५ हजार रूपये नेता येणार
विदेशी नागरिकांना भारतीय चलन देशाबाहेर नेण्याची परवानगी नाही. त्यातही पाकिस्तान आणि बांग्लादेशातून येजा करणार्या नागरिकांनाही भारतीय चलन देशाबाहेर नेण्याची परवानगी नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.