‘जिहाद’साठी सोशल मिडीयाचा गैरवापर

social-media
नवी दिल्ली – इराकमध्ये सुरु असलेल्या युद्धात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाचे (आयएसआयएस) दहशतवादी इंटरनेटचा गैरवापर करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, विशेष म्हणजे सोशल मिडीयाचा त्यांनी गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जिहाद’मध्ये सहभागी होण्याबाबत तरुणाईला आवाहन केले जात असून अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवून भावना भडकवण्याचे काम होत आहे. ‘आयएसआयएस’द्वारा ‘नो लाइफ विदाउट जिहाद’ या शिर्षकाखाली इंटरनेटवर छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत. सध्या ही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. आयएसआयएसला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचेही तरुणाईला खोटे सांगितले जात आहे. आयएसआयएसने गेल्या एप्रिलमध्येच अँड्राईड अॅप विकसित केले होते. हे अॅप गूगल प्ले स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. मात्र, ‘गूगल’वरून हे अॅप हटवण्यात आले असले तरी ट्विटरने आतापर्यत ‘आयएसआयएस’वर कोणतीही बंदी घातलेली दिसत नाही

Leave a Comment