जर्मनी–घाना आमनेसामने

jarmani

सांता आन्द्रे : जर्मनीपुढे घानावर विजय मिळवीत बाद फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुरुवातीच्याा सामन्यात पोतरुगालसारख्या मजबूत संघाला ४-० अशी धूळ चारणारा जर्मनी शनिवारी जी गटातील पुढील लढतीत घानाला नॉकआऊट करून अंतिम १६ जणांत प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

या सामन्यात जर्मनीला घानाच्या केव्हिन प्रिन्स बोटेंग याला देखील जोरदार प्रत्युत्तर द्यायचे आहे. जर्मनीत जन्मलेल्या बोटेंगने जोआकिम लोऊच्या जर्मन संघावर आरोप केला होता. त्याने जर्मन संघाकडे कठीण सामन्यात संघाला संकटाबाहेर काढणारा एकही खेळाडू नसल्याचा आरोप केला होता.

जर्मनीला युरो २०१२च्या उपांत्य फेरीत इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता आणि गतवर्षी स्वीडनविरुद्ध त्यांचा सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता; परंतु या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने पोतरुगालला ४-० अशी धूळ चारताना वादळी सुरुवात केली आहे. घानाला सलामीच्या लढतीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

Leave a Comment