कोलंबियाचा पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश

kolmbasa

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर कोलंबियाने पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबियाने या सामन्याित डिडीएर ड्रॉग्बाच्या आयव्हरी कोस्टवर २-१ अशी मात केली. कोलंबियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले जेम्स रॉड्रिगेज आणि क्विन्टेरो हे ठरले. त्यान केलेल्या गोलच्या मदतीमुळे कोलंबियाला या सामन्यात विजय मिळविता आला.

या फुटबॉल सामन्याच्या उत्तरार्धात जेम्स रॉड्रिगेजने ६४ व्या मिनिटाला गोल करुन कोलंबियाचे खाते उघडले आहे. त्यानंतर ७०व्या मिनिटाला क्विन्टेरोने गोल केला आणि कोलंबियाची आघाडी २-० अशी वाढवली आहे. त्याच्या मदतीच्या जोरावरच कोंलबिया संघाला हा सामना जिंकता आला आहे.

तीनच मिनिटांनी जर्विन्होने आयव्हरी कोस्टाकडून एकमेव गोल केला. आयव्हरी कोस्टचे त्यानंतरचे प्रयत्न मात्र अयशस्वी ठरले. ड्रॉग्बाच्या टीमला आता बाद फेरी गाठण्यासाठी पुढचा सामना जिंकणं आवश्यक आहे.

Leave a Comment