भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील अग्रणी इस्त्रो ३० जून रोजी चार देशांचे उपग्रह त्यांच्या श्रीहरिकोटा स्थानकावरून अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात इस्त्रोची कीर्ती आहे. हे पाच उपग्रह स्वदेशी बनावटीच्या पीएसएलव्ही सी-२३ च्या सहाय्याने अंतराळात पाठविले जाणार आहेत. फ्रान्सचा स्पॉट सात हा ७१४ किलो वजनाचा उपग्रह तेसच जर्मनीचा कमी वजनाचा एआय सेट, कॅनडाचे एनएसएल ७.१ व एनएसएल ७०२ हे दोन उपग्रह व सिंगापूरचा वेलॉक्स १ हा उपग्रह असे पाच उपग्रह इस्त्रो प्रक्षेपित करणार आहे.
इस्त्रो प्रक्षेपित करणार चार देशांचे उपग्रह
इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीही भारताने याच स्थानकावरून २६ उपग्रह लाँच केले आणि त्यातील २५ यशस्वीपणे लाँच केले गेले. याच संस्थेतर्फे भारताचे मंगळयानही प्रक्षेपित केले गेले आहे. भारत अंतरीक्ष संशोधन क्षेत्रात जगात सहाव्या क्रमांकावर आहे यूएस. जपान. चीन, कॅनडा व फ्रान्स हे देश भारताच्या पुढे आहेत.
इस्त्रोतील कार्यक्रमांचे अपडेट यापुढे फेसबुकवरही मिळू शकणार आहेत. त्यासाठी इस्त्रो एमओएम आणि इस्त्रो ऑफिशियल अशी दोन पाने फेसबुकवर तयार केली गेली आहेत असेही त्यांनी सांगितले.