21 जुलैपर्यंत लांबली जिया खान आत्महत्या प्रकरण सुनावणी

jiha-khan
मुंबई – मुंबई सेशन कोर्टाने अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात खटल्याची सुनावणी 21 जुलैपर्यंत स्थगित केली आहे. या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पंचोली मुख्य आरोपी असून, सूरजने न्यायालयात स्वतः हजर न राहण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. सत्र न्यायाधीश ए.एस शिंदे यांनी या प्रकरणात सुनावणी स्थगित केली आहे. यात आपल्या मुलासोबत आलेल्या आदित्य पंचोली याने न्यायालयाच्या बाहेर उपस्थित पत्रकारांना सांगितले, की या प्रकरणात लवकरात लवकर एक एसआयटी तयार व्हायला पाहिजे.

Leave a Comment