स्पेनला मिळाला नवा राजा

spain
माद्रिद – जुआन कार्लोस यांनी ३९ वर्षे राजेपद भोगल्यानंतर मुलगा फिलिप याच्याकडे स्पेनची सत्ता सोपविण्याचा मिर्णय जाहीर केल्यानंतर स्पेनमध्ये गुरूवारी अत्यंत साधेपणाने फिलिप यांचा नवा राजा म्हणून शपथविधी पार पडला. लष्करी गणवेशात त्यांनी राजेपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर पत्नी व स्पेनची नवी राणी लेटिजिया आणि त्यांच्या दोन कन्या उपस्थित होत्या. या सोहळ्याला कोणत्याही परदेशी पाहुण्यांना निमंत्रण दिले गेले नव्हते.

नव्या राजाकडून म्हणजे राजा फिलिपकडून स्पेनच्या जनतेला खूप अपेक्षा आहेत. पंतप्रधान मरिआनो राजॉय यांनी नव्या राजाचे वर्णन स्वतंत्रता, समानता, आशा आणि सद्भावनांचे प्रतीक असे केले आहे. स्पेनमधील प्रथेप्रमाणे राजाच देश आणि लष्कराचा प्रमुख असतो. राजा फिलिप अॅथलेट आहे. त्यांनी १९९२ च्या बार्सिलोना गेम्स तसेच ऑलींपिक स्पर्धेतही भाग घेतला होता. देशाच्या सेलींग टीमचे नेतृत्त्व त्यांच्याकडे होते. त्यांची पत्नी लेटिजिया विवाहापूर्वी पत्रकार आणि न्यूज अँकर म्हणून काम करत होती. स्पेनमध्ये राजाला वार्षिक पगार दिला जातो त्यानुसार राजा फिलिप यांना वर्षाला १ कोटी २८ लाख रूपये तर राणी लेटिजिया हिला ९० लाख रूपये पगार दिला जाणार आहे.

Leave a Comment