सोशल नेटवर्कचा ट्रेंड सांगणारे फ्रेंडशीप पॅराडॉक्स टूल

paradox
सोशल नेटवर्क साईटवर पुढच्या दोन महिन्यांत कोणता ट्रेंड असेल हे अगोदरच जाणून घेण्याचा अनोखा आनंद मिळवून देणारे एक टूल बाजारात आले असून त्याचे नांव आहे द फ्रेंडशीप पॅराडॉक्स टूल. याचा सर्वाधिक फायदा असे ट्रेंड जाणून घेण्याचा ज्यांचा व्यवसायच आहे त्यांना सर्वाधिक होणार हे नक्कीच.

हे नवे अॅप ट्वीटर सारख्या लोकप्रिय सोशल नेटवर्कवर पुढच्या काळात होणार्‍या सोशल मुव्हमेंट, ग्राहक प्रतिक्रिया तसेच संभावित आजार यांचे भविष्य वर्तवू शकणार आहे. नेटवर्कवरची कोणती सूचना ट्वीटरसारख्या साईटवर प्रासंगिक स्वरूपात आली आणि पूर्ण इंटरनेटवर व्हायरल होऊ शकेल याची माहिती हे अॅप देणार आहे. माद्रीद येथील संशोधकांनी २००९ पपान १५ अब्ज फॉलोअर आणि ४ कोटी युजरचा डेटा सँपलचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढले आहेत.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील मॅन्युएल ग्रेसिया हेरांज यांचा हे टूल बनविण्यात सहभाग आहे. ते म्हणतात कोणत्याही युजरचे फॉलोअर महिती प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावत असतात असे आम्हाला आढळून आले. कोणतीही बातमी अथवा माहिती अत्यंत अल्प वेळात व्हायरल होण्यामागे हे फॉलोअरच कारणीभूत असतात. संशोधकांच्या मते सोशल नेटवर्क मॉनिटर करण्याची ही सर्वाधिक सोपी व प्रभावी पद्धत आहे. हे अॅप बनविण्यासाठी ट्वीटरवरील ५० हजार युजरचा डेटा पुरेसा ठरला असून पुढील ट्रेंडची भविष्यवाणी करण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे.

Leave a Comment