सीरिया बॉम्बस्फोट; 34 ठार, 50 जखमी

syria-bomb-blast
दमास्कस : सीरियात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले हिंसाचाराचे सत्र अद्यापही सुरूच आहे. मध्य सीरियामध्ये आज झालेल्या एका कारबॉम्ब स्फोटात 34 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

हमा शहराच्या जवळच्या होरा या गावी हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की त्यात 34 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 50 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. सीरियाच्या वृत्तसंस्थेमार्फत ही माहिती देण्यात आली असली, तरी याबाबतची अधिक माहिती मात्र देण्यात आली नाही. या हल्ल्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment