सव्वा लाख भारतीय नोकरदारांचा ब्रिटनमध्ये अपेक्षाभंग ;दिवाळी -ईदची सुट्टी नाही

indian
लंडन – हिंदू आणि मुस्लिम समाजासाठी महत्त्वाचे दिवस असलेल्या दिवाळी आणि ईद या सणांनिमित्त राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यास ब्रिटिश सरकारने नकार दिला दिल्याने सव्वा लाख भारतीय नोकरदारांचा अपेक्षाभंग झाला आहे ,ब्रिटनमध्ये एका कॅलेंडर वर्षात आधीच बर्‍याच सुट्या असून, या अतिरिक्त सुट्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे कारण कॅमेरून प्रशासनाने दिले आहे.

ब्रिटनमध्ये भारतीय, पाकिस्तानी नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. यातही हिंदू आणि मुस्लिम समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन्ही धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दिवाळी आणि ईद या सणांनिमित्त सरकारने सार्वजनिक सुटी द्यावी, अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका या समुदायांनी केली होती. सुमारे १ लाख २१ हजार ८४३ जणांच्या स्वाक्षर्‍या असलेली ही याचिका हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच ब्रिटिश संसदेतील लोकसभेकडे पाठवण्यात आली होती. या मुद्दय़ावर चर्चा होणे अपेक्षित होते, मात्र उद्योग व कौशल्य विभागाने आपला निर्णय देत सध्या अस्तित्वात असलेल्या सुट्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सार्वत्रिक सुट्या देता येणार नसल्याचे जाहीर केले. दिवाळी, ईदच्या दिवशी सुटी मिळाल्यास काही समुदायांना नक्कीच फायदा होईल; परंतु यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे दोन्ही सण ब्रिटनमध्ये मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. तरीही तेथील सरकारने नकार दिला आहे . पण एकमेकांचे आचारविचार, परंपरा, संस्कृती यांची या सणांच्या माध्यमातून देवाण-घेवाण होते आणि सामाजिक एकोप्यासाठी हे आवश्यक आहे. हिंदू, मुस्लिम समाजासाठी या सणांचे असलेले महत्त्वही आम्हाला माहीत आहे ,असेही म्हटले आहे

Leave a Comment