वैष्णव देवीच्या भाविकांसाठी ‘गुड न्यूज’

vaishano-devi
कटरा – वैष्णव देवीचे मंदिर म्हटले की डोळयासमोर येते १४ किलोमीटची चढाई आणि एकच हेलिपैड तिथेही गर्दीच गर्दी. आता मात्र वैष्णव देवीच्या भाविकांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. मातेच्या भवनजवळ एक नविन हेलीपैड तयार होत आहे. भवनाच्या अगदीजवळ एक किलोमीटर अंतरावर ‘पंछी पॉइंट’ जवळ हेलीपैड असून नागरिक उड्‌डान मंत्रीचे विशेष अधिकारींनी आज याचे ट्रायलही घेतले आहे.

नविन हेलीपैडमुळे आता दर्शन अजून सोपे होणार आहे. आतापर्यंत एकच हेलीपैड असल्यामुळे तिकीटांसाठी लोकांना दोन किंवा तीन दिवस कटरा येथे थांबावे लागत होते

सध्या दोन खाजगी कंपन्या कटरा ते सांझी छतपर्यंत हेलीकॉप्टरची सुविधा देत आहे. सांझी छतपासून भवन दोन किलोमीटर अंतरावर आहे. मात्र नविन सेवा सुरू झाल्यास भवनाचे अंतर एक किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे वृद्ध लोकांना दिलासा मिळाला आहे. रोज कटरा ते भवन हेलीकॉप्टरने जाणारे भाविकांची संख्या जवळपास ८०० ते १००० आहे. ही संख्या आता विभाजित होणार हे नक्की.

Leave a Comment