फुटबॉलमधील पराभवामुळे इंग्लंडच्या आशा धूसर

england

साल्वादोर -: फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील शेवटपर्यंत अटातटीच्याा ठरलेल्या या लढतीत उरुग्वेने इंग्लंड संघाचा पराभव केला. उरुग्वेने इंग्लंडचा २-१ ने पराभव करीत विश्वचषक स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये जाण्याच्या इंग्लंडच्या आशा धूसर झाल्या आहेत. या सामन्यात विश्वचषक स्पर्धेला साजेसा खेळ करीत उरुग्वेने विजय मिळवीत बाद फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात उरुग्वेच्या लुईस सॉरेझनं फिटनेसच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दोन गोल करून उरुग्वेला धडाकेबाज विजय मिळवून दिला. मॅच सुरू झाल्यानंतर ३९व्या मिनिटाला लुईसने पहिला गोल केला. ७५ व्या मिनिटाला इंग्लंडने गोल करीत या सामन्याुत बरोबरी साधत. या सामन्यात रंगत आणली होती.

त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण की, ही मॅच संपायला पाच मिनिटं बाकी असताना त्यानंतर इंग्लंडच्या बचाव पंक्तीला हेरत लुईसने आणखी एक गोल करून उरुग्वेला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे विश्वचषक स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये जाण्याच्या इंग्लंडच्या आशा धूसर झाल्या आहेत.

Leave a Comment