जपान-ग्रीस सामना बरोबरीत

barobari

नातल – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप सी मधील जपान आणि ग्रीसमधील सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघाना निर्घारित वेळेत गोल करता न आल्याने या दोन्ही संघा दरम्यानचा सामना ०-० असा बरोबरीत सुटला. संपूर्ण सामन्यात चेंडूवर सर्वाधिक वेळ जपानचे नियंत्रण होते. मात्र त्यांना ग्रीसचा बचाव भेदून गोल करण्याची संधी साधता आली नाही.

जपानचे आक्रमण रोखण्यात ग्रीसच्या बचाव फळीला यश आले. पंचांनी ग्रीसचा कर्णधार कोनस्टांनटिनोसला सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवले होते. त्यामुळे मैदानावर ग्रीसचे फक्त दहा खेळाडू राहिले होते. मात्र त्याचाही जपानला फायदा उचलून यावेळेत गोल करता आला नाही.

सामना अनिर्णीत सुटल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. ग्रुप सी मधुन कोलंबियाने अंतिम सोळामध्ये प्रवेश केला आहे. २४ वर्षामध्ये प्रथमच कोलंबियाने अंतिम सोळामध्ये प्रवेश केला आहे. जपान आणि ग्रीसचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले नाही. मात्र पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना गटातील शेवटचा सामने जिंकणे अनिवार्य आहे.

Leave a Comment