एगॉन इंटरनॅशनल स्पर्धेत सानिया-पेसचा पराभव

sania
इस्टबोयुर्ने – भारताचे एगॉन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेतील आव्हान भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि लिएंडर पेसच्या पराभवाने संपुष्टात आले आहे. विम्बलंडन पूर्वी तयारी करण्याची ही अखेरची स्पर्धा होती.

महिला दुहेरीत तिसरे मानांकन मिळालेल्या सानिया-कारा ब्लॅक जोडीचा बिनसीडेड हाओ चिंग चान आणि युंग जान चान या तैपईच्या जोडीने पराभव केला. पहिला सेट १-६ असा गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकत सानिया-ब्लॅक जोडीने सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र अखेरच्या सेटमध्ये तैपईच्या जोडीने कामगिरी उंचावत सेटसह सामना जिंकला.

पुरुष दुहेरीत पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळणा-या लिएंडर पेसलाही पराभव स्वीकारावा लागला. दुस-या सीडेड पेस-ऐसाम जोडीचा हुये-डॉमिनिक जोडीने३-६, ४-६ असा सरळसेटमध्ये पराभव केला. पेस आणि सानिया दोघांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

वर्षातील तिसरी ग्रॅण्डस्लॅम आणि विम्बलंडन चॅम्पियनशीप स्पर्धा सोमवारी सुरु होत आहे. विम्बलंडनमध्ये पुरुष दुहेरीत पेस-राडेक स्टेपानेक जोडीला पाचवे, बोपन्ना-कुरेशी जोडीला आठवे आणि महिला दुहेरीत सानिया-ब्लॅक जोडीला चौथे सीडींग देण्यात आले आहे.

Leave a Comment