शाकीब अल हसनच्या पत्नीचा विनयभंग

shakib
ढाका – मीरपूरच्या स्टेडियममध्ये बांगलादेश क्रिकेट संघाचा सवेसर्वा आणि कोलकाता नाइट रायडर्सचा प्रमुख शिलेदार शाकीब अल हसन याच्या पत्नीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

भारत – बांगलादेशदरम्यान १५ जून रोजी मीरपूरला दुसरा वनडे सामना झाला होता. हा सामना बघायला शाकीब अल हसनची पत्नीही आली होती. सामना सुरू असताना पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आले, तेव्हाच स्टेडियममध्ये बसलेल्या काही तरूणांनी शाकीबच्या पत्नीशी छेडछाड केली . हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी या गटाला चोप दिला मात्र पोलिसांच्या हवाली केले नाही.

सामना संपल्यानंतर शाकीबने या विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी राहीदला अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा तपास सुरू आहे.

Leave a Comment