माझगांव डॉकमध्ये मेगा भरती

vacancy
मुंबई – माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.

यामध्ये मास्टर क्लास टू – १ जागा, ज्यु. ड्राफ्टसमन १९ जागा, ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-मेकॅनिक १२ जागा, ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक १० जागा, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक – मेकॅनिक १७ जागा, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक-इलेक्ट्रिकल ३ जागा, भांडारपाल १० जागा, फिटर २८१ जागा, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर २६० जागा, पाईप फिटर २९२ जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ५५ जागा, पेंटर ५९ जागा, सुतार ४२ जागा, कंम्पोझाईट वेल्डर १७४ जागा, रिगर १२८ जागा, मॅकॅनिस्ट १४ जागा, कॉम्प्रेसर अटेंडंट ३ जागा), डिझेल क्रेन ऑपरेटर १ जागा), सुरक्षा शिपाई २१ जागा, युटिलिट हँड १२७ जागा, आणि चिपर ग्राईंडर ही १०४ पदे भरण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 4 जूनपासून हे अर्ज अपलब्ध असून 03 जुलैपर्यंत करता येऊ शकतात.

यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आणि यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.