महिला खासदाराची गोळ्या घालून हत्या

firing
लाहोर – पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी महिला खासदारावर गोळीबार झाला होता. या महिला खासदारावर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

तहिरा असिफ असे या मृत खासदाराचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी त्या गाडीने संसदेत जात असताना, इक्‍बाल गावाजवळ एका मोटारसायकवरून आलेल्या बंदूकधारी व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तहिरा असिफ यांचे पती मुहाम्मद असिफ यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमचे कोणाशीही वैर नसल्याचे मुहाम्मद यांनी म्हटले आहे. दरम्यान, मालमत्तेच्या कारणावरून गोळीबार झाला असावा अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment