फ्रान्स –स्वित्झर्लंड लढतीकडे लक्ष

france

साल्वादोर – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील लढती दिवसेंदिवस रंगतदार ठरत असल्याने त्यामधील उत्साह वाढत चालला आहे. ‘ग्रुप इ’मध्ये सलामीच्या लढती जिंकलेले फ्रान्स आणि स्वित्झर्लंडलड हे दोन संघ शुक्रवारी आमनेसामने येत आहेत. रॅँकिंगप्रमाणे पाहिल्यास स्वित्झर्लंडलडचे सहावे आणि फ्रान्सचे १७वे रॅँकिंग आहे. त्यामुळे या सामन्यात स्वित्झर्लंडलडचे पारडे जड मानले जात आहे.

या सामन्याात विजय मिळविणारा संघ बाद फेरीत प्रवेश करणार आहे. त्या मुळे या सामन्या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फ्रान्सला या लढतीसाठी विजयाचा दावेदार मानण्यात येत आहे. त्यातच फ्रान्स २०१०च्या गटवार साखळीत गारद होण्याच्या कटू आठवणीही पुसण्यासाठी सज्ज आहे.

सुरुवातीच्या सामन्यात दोन्ही संघाने विजय मिळवल्याने दोन्ही संघाच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावलल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीतील स्थान निश्‍चीत करण्याकडे दोन्ही संघाचा कल असणार आहे. या सामन्यात फ्रान्स आणि स्वित्झर्लंडलडविरुद्ध विजय गरजेचा आहे.

Leave a Comment