नवी दिल्ली – प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर पोहचले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा प्रीती आणि नेस वाडिया या दोघांमध्ये वाद सुरू होता तेव्हा तिथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही उपस्थित होता. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणात अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रीती झिंटा -नेस वाडिया प्रकरण ; अर्जुनची साक्ष नोंदविणार ?
या प्रकरणाची चौकशी करणारे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार, नेस वाडिया यांनी प्रीतीशी वाद घालताना सचिनचा अल्पवयीन मुलगा अर्जुन यालाही शिव्या घातल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 तारखेला मॅचचे व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर नेस वाडिया यांनी प्रीती झिंटाशी वाद घालताना अर्जुनने त्यात हस्तक्षेप केला पण तो वाडिया यांना खटकला . त्यामुळे त्यांनी तिथेच अर्जुनाला अपशब्द वापरले होते. अर्जुनने वादावर दुसर्यांना डिस्टर्ब करू नका ,अशी विनंती केली होती. त्यामुळे नेस वाडिया यांनी त्याला शिव्या घातल्या होत्या. त्यामुळे पोलीसही अर्जुनकडून प्रत्यक्ष घटना काय घडली याची माहिती घेण्याबरोबरच साक्षीदार करण्याबाबत चाचपणी करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.