टीम इंडियाने बांगलादेशविरुध्दची मालिका जिंकली
ढाका – बांगलादेशविरूध्दचा तिसरा वन डे सामना पावसामुळे रद्द झाल्याने टीम इंडियाने ही मालिका २-० ने जिंकली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवीत टीम इंडियाने ही मालिका जिंकली होती. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याला मालिकावीरचा पुरस्कर देण्यात आला.
ढाका येथील मैदानावर खेळण्यात येत असलेल्या तिस-या सामन्यात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर अवघ्या ८ धावांत बाद झाल्यााने टीम इंडिया संकटात सपाडली असताना उथप्पाने ५ तर रहाणेने ३ धावा केल्या. तर अंबाती रायडूही ३ धावांवर बाद झाल्याने लवकरच तिसरा झटकाही बसला. तर त्याच्या पाठोपाठ या सामन्याझत संधी मिळालेला मनोज तिवारीही केवळ मैदानावर हजेरी लावून दोन धावा काढून बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १८ अशी झाली होती. त्यानंतर रैनाने १५ धावा करत धावसंख्या ३७ पर्यंत नेली, मात्र बाराव्या षटकात पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर षटके कमी करून सामना सुरू करण्यात आला.
चार गडी लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रैनाने चांगला खेळ करत आशा जागवल्या होत्या. मात्र रहीमच्या गोलंदाजीवर २५ धावांवर बाद होत त्यानेही सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या पाठोपाठ वृद्धीमान साहादेखिल स्वस्तात बाद झाला. दरम्यान, चेतेश्वर पुजाराने मात्र एक बाजू लावून धरली होती. मात्र तोही २७ धावांवर बाद झाला. त्यानतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका २-० ने जिंकली