अमेरिकच्या गुप्त लष्करी आणि राजकीय हेरगिरीसंबंधीची गुप्त कागदपत्रे जगासमोर आणणार्या विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने त्याच्या कुटुंबाला धोका असल्याची तक्रार केली आहे. आपल्या मुलांना आणि आईला सतत अज्ञात इसमांकडून धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे त्याने इक्वेडोरच्या दूतावासातून पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. असंजे म्हणतो, गेली चार वर्षे मी माझ्या कुटुंबाला भेटलेलो नाही मात्र त्यांच्या जीवाची मला काळजी वाटते आहे.
कुटुंब धोक्यात असल्याची असांजेला भीती
लैंगिक शोषणाच्या आरोपावरून स्वीडनला हवा असलेला असांजे गेली चार वर्षे ब्रिटनमध्ये होता. मात्र आपले हस्तांतरण केले जाऊ नये यासाठी त्याने लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात दोन वर्षांपूर्वी आश्रय घेतला असून इक्वेडोरने त्याला राजाश्रय दिला आहे. मात्र दूतावासातून बाहेर पडल्यास त्याला अटक करण्यासाठी ब्रिटन पोलिसांचा त्याच्यावर कडक पहारा आहे. काल त्याने दूतावासासमोर जमलेल्या त्याच्या समर्थकांना गॅलरीत येऊन अभिवादन केले त्यावेळी तो बोलत होता.