स्पेन साखळीतूनच स्पर्धेबाहेर

fifa4

ओ दी जानेरो- फुटबॉल विश्चचषक स्पर्धेतील स्पेन संघाला चिली विरूध्दच्या सामन्यात सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्याने वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्कीे त्यांच्यावर ओढावली आहे. चिली संघाने गतविजेत्या स्पेनला २-० अशी धूळ चारत साखळीतूनच गारद केले आहे. सलामीच्या लढतीत नेदरलँड्सने स्पेनचा ५-१ असा फडशा पाडला होता. स्पेनला ५१ वर्षांत प्रथमच अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मराकाना स्टेडियममध्ये ‘ब’ गटातील सामना सुरू होताच चिलीच्या संघाने स्पेनवर जोरदार आक्रमण केले. चिलीच्या खेळाडुंची देहबोली आज विजयासाठीच खेळायचं अशीच होती. त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ करायचा असे ठरवले आहे, असेच त्यांच्या खेळाकडे पाहून लक्षात येत होते. चिलीच्या एनड्युरडो वर्गास याने २० व्या मिनिटाला स्पेनवर गोल डागला आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरही स्पेननच्या खेळात आक्रमकता दिसायला हवी होती. याउलट चिली संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. त्यानंतर मध्यांतराला अवघे दोन मिनिट असताना चिलीच्या चार्ल्स अरंगेने ४३ व्या मिनिटाला अप्रतिम गोल झळकावला आणि स्पेनच्या पराभवावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखेच चित्र निर्माण झाले.

मध्यांतरानंतर स्पेनने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. पहिली काही मिनिटे त्यांनी आक्रमकता दाखवली. मात्र चिलीच्या बचावा पुढे आणि गोलकिपर ब्राव्होनं दाखवलेल्या चपळतेमुळे स्पेनचा हल्ला काही चमक दाखवू शकला नाही. खेळ शेवटाकडे सरकू लागला तसे स्पेनंचा खेळ पुन्हा पराभूत मनोवृत्तीनेच खेळला जात आहे, असं जाणवू लागलं आणि शेवटी तेच झाले गतविजेत्या स्पेनला पराभव स्वीकारावा लागला.

Leave a Comment