लवकरच येतेय फाईव्ह जी नेटवर्क

5g
टूजी, थ्रीजी नेटवर्क चांगले रूळल्यानंतर आता उपयोगात आणले जात असलेले फोर जी नेटवर्क पुरे रूळायच्या आतच दूरसंचार विभागातील कांही कंपन्यांनी फाईव्ह जी नेटवर्क आणण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. भारतात अजून फोर जी नेटवर्क सर्वत्र उपलब्ध नाही तसेच ते जगातील अनेक देशांतही उपलब्ध नाही. मात्र त्यापूर्वीच युरोपिय आयोग व दक्षिण कोरिया सरकारने एक करार केला असून त्यानुसार जगातील कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचण्यासाठी युजरना फाईव्ह जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

याविषयीचे संशेाधन सुरू झाले आहे आणि हार्मनाईज्ड रेडियो स्पेक्ट्रम व वैश्विक फाईव्ह जी मानकांच्या मदतीने हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. २०१५ सालच्या अखेरी या संदर्भात चांगली प्रगती झालेली असेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment