युवांची कनेक्टवाहिनी पडली बंद

facebook
नवी दिल्ली – सोशल नेटवर्किंग साईट म्हणून प्रसिद्ध ‘फेसबूक’ ही युवकांची कनेक्टवाहिनी काही काळासाठी बंद पडले होती. तांत्रिक बिघाडामुळे आज दुपारी १.३० वाजल्यापासून ही सोशल नेटवर्किंग साईट बंद पडली. फेसबूकचे होमपेज व इतर पेजेसवर ‘Sorry, something went wrong. – We’re working on getting this fixed as soon as we can’ असा मेसेज झळकत होता. याचा परिणाम फेसबूकच्या मोबाईल व्हर्जनहीवरही दिसत होता व ते देखील बंद पडले होते.

जगभरातून लाखो उपभोक्त्यानी १५ मिनिटांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रॉब्लेमबद्दल तक्रार नोंदवली. अमेरिका, इंग्लंड, युरोपसह आशियातील अनेक उपभोक्त्यानी ट्विटरवरही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील फेसबूकवर अशीच समस्या निर्माण झाली होती, त्यावेळी एररमुळे लाखो उपभोक्त्याना फेसबूकवर लॉग-इनच करता येत नव्हते.

Leave a Comment