मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाला 11 जुलैचा मुहूर्त

narendra-modi
नवी दिल्ली : पहिला रेल्वे अर्थसंकल्प 9 जुलैला तर सर्वसाधारण अर्थसंकल्प 11 जुलैला सादर मोदी सरकारने मुहूर्त साधला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 ते 28 जुलैपर्यंत पार पडणार आहे.

रेल्वे अर्थसंकल्प 9 जुलैला केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा संसदेत सादर करतील. रेल्वेच्या भाडेवाढीबाबतचा निर्णय यात अपेक्षित आहे. अच्छे दिन आने वाले है असे आश्वासन देत बहुमताने भाजप केंद्रात निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांचे डोळे चातकासारखे जुलै महिन्याकडे लागले आहेत. येत्या अर्थसंकल्पात वाढती महागाई रोखण्यासाठी मोदी सरकार काय निर्णय घेणार आणि सर्वसामान्यांच्या खिशात पैसा खुळखुळणार का हे बघणे महत्वाचे असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सादर होणाऱ्या या पहिल्या अर्थसंकल्पाकडे त्यामुळे केवळ भारतातील अर्थगणित नाही तर आंतरराष्ट्रीय गणितही अवलंबून असणार आहेत.

Leave a Comment